![]() |
राजू बनपट्टी |
करण व्हावळ / जयसिंगपूर प्रतिनिधी :
जयसिंगपूर शहरातील ५२ झोपडपट्टी मधील हनुमान मंदिर लगत राहणारे राजू हनमा बनपट्टे वय ४३ यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला करण्यात आला आहे. हा तरुण गंभीर जखमी असल्याने जयसिंगपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली.
राजू बनपट्टे हे कॉन्ट्रॅक्टरची कामे करून आपला चरितार्थ चालवित असतात मात्र काल त्यांच्या घराशेजारी किरकोळ कारणावरून वादावादी झाली असल्याची माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे. त्यामुळे या घटनेकडे एका वेगळ्या नजरेतून पाहिले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा