शिरोळ रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी दिपक ढवळे, सचिवपदी सचिन देशमुख तर ट्रेझररपदी संदीप बावचे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष विजय माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडी पार पडल्या.
शिरोळ रोटरी क्लबच्या सन २०२१-२०२२ सालातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी टारे लॉनवर बैठक झाली.आगामी वर्षात रोटरीकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय यावेळी झाला.
यावेळी पंडीत काळे, अविनाश टारे, बाळासो शेट्टी, मोहन माने, नितीन शेट्टी, चिंतामणी गोंदकर, प्रताप देसाई, डॉ. अंगराज माने, संतोष काळे, युवराज जाधव, शरद चुडमुंगे, बापूसो गंगधर, श्रीकांत शिरगुप्पे, धैर्यशील पाटील, सुनिल बागडी, अमित पंडीत, सुरेश पाटील, पिंटू गावडे, अतुल टारे, आबा जाधव, रवि जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
माहितीस्तव : शिरोळ रोटरी क्लबकडून १ जुलैला कार्यक्रम होणार असून त्यामध्ये देवदूत ठरलेल्या डॉक्टरांचा सन्मान
शिरोळ : जागतिक डॉक्टर्स डे च्या निमित्ताने १ जुलै रोजी शिरोळ रोटरी क्लब व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरांचा सन्मान करण्यात येणार आहे. नगरपालिका सभागृहात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष दिपक ढवळे, सचिव सचिन देशमुख यांनी दिली.
कोविड साथीच्या कालावधीमध्ये देवदूत ठरलेले वेगवेगळ्या विभागातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते तर मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास असिस्टंट गव्हर्नर रोटे रूस्तुम मुजावर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, रोटरी क्लबचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा