मुंबई : तुम्ही कुठेही असा, काहीही करत असा..तरी सोशल मीडियावर (Social Media) तुमची एखादी छबी, तुमचं व्यक्तिमत्त्व, एखादी टॅगलाईन तुम्हाला प्रसिद्ध करु शकते. याचं चांगलं उदाहरण म्हणजे सध्या सोशल मीडियावर होत असलेल्या सिलिंडर मॅनची (Cylinder Man) चर्चा आहे.
अंबरनाथजवळ भारतगॅसचे (BharatGas) सिलिंडर घरोघरी वितरीत करणाऱ्या एका तरुणाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. कारण आहे, त्याचं करारी व्यक्तिमत्तव आणि फेसबुक वापरकर्त्याने त्याविषयी टाकलेली पोस्टमुळे. साधारण सहा फूट उंचीच्या या हँडसम तरुणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अनेकांना त्याचे व्यक्तिमत्त्व इतके देखणे वाटले की, त्यांनी आम्हाला त्याला बेवसिरीज किंवा चित्रपटात महत्त्वाची भूमिका करताना पहायला आवडेल.
तुषार भामरे नावाच्या तरुणाने फेसबुकवर सिलिंडर मॅनविषयी पोस्ट केलं आहे. तो गाडीत बसलेला असताना सहज त्याने सिलिंडरच्या गाडीमागे अंगावर भारतगॅसचा युनिफॉर्म घातलेल्या तरुणाचे फोटो क्लिक केले. आणि फेसबुववर त्याच्याविषयी पोस्ट केलं. पोस्टमध्ये त्याने एखाद्या वेबसिरिजमध्ये शोभणारा असं लिहिलं आहे. त्यानंतर आतापर्यंत विविध पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
अंबरनाथजवळ हा फोटो काढण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी तर त्याला अभिनय क्षेत्रात काम देणार असल्याचंही म्हटलं आहे. करारी नजर, भारदस्त व्यक्तिमत्वामुळे सोशल मीडियावर या सिलिंडर मॅनची जोरदार चर्चा सुरू आहे.
या तरुणाचे फोटो खरोखरीच एखाद्या वेब सिरिजमधील अभिनेत्याला शोभणारे असेच म्हणायला हवेत. या तरुणाचं नाव सागर जाधव असल्याचं समोर आलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा