Breaking

सोमवार, २१ जून, २०२१

"करदात्यानो, लवकर Income Tax Return भरा, अन्यथा दुप्पट TDS"

 



मुंबई : काही कारणास्तव आपण अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरला नसेल, तर लवकच भरा. आयटीआरच्या (ITR) नवीन नियमांनुसार, जर आपण 30 जूनपर्यंत रिटर्न भरले नाही तर 1 जुलैपासून तुम्हाला दुप्पट टीडीएस भरावा लागेल. यामुळे आयकर विभागाने आयटीआर न भरलेल्यांना ते भरण्यासाठी दुसरी संधी देत ​​आहे. 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरण (आयटीआर) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासह इनकम टॅक्ससाठी नवीन पोर्टलही सुरू करण्यात आले आहे.


ITR न भरल्यास दुप्पट TDS


फायनान्स अ‍ॅक्ट 2021 नुसार, मागील 2 वर्षांत आयकर विवरणपत्र न भरलेल्या करदात्यांनी आणि मागील दोन्ही वर्षांमध्ये टीडीएस (Tax Deduction at source) किंवा टीसीएस ((Tax collection at source) 50 हजारांपेक्षा जास्त होते, अशा प्रकरणात यावर्षी 1 जुलै 2021 पासून त्याचे टीडीएस सध्याच्या प्रभावी दरापेक्षा दुप्पटीने किंवा 5 टक्क्यांनी जे दोहोंमध्ये अधिक आहे, ते कापण्यात येईल. टीडीएसच्या नवीन नियमांनुसार,   प्राप्तिकर अधिनियम 1961 च्या कलम 206 एबी अंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे. 

 

नवा नियम यावर लागू होणार नाही


प्राप्तिकर कलम 206ABचा हा नियम कलम 192 नुसार वेतन, 192 A अंतर्गत कर्मचार्‍यांच्या थकबाकीची भरपाई, 194B नुसार, लॉटरी, जिंकलेली रक्कम, घोड्यांच्या शर्यतीत जिंकलेली रक्कम, 194LBC अंतर्गत सिक्युरिटीकरण ट्रस्टमध्ये केलेली गुंतवणूकीतून मिळालेल्या रक्कमेवर आणि रोखीवर  लागू होणार नाही.  

      कलम 206AB अंतर्गत भारतात कायमस्वरूपी स्थापना नसलेल्या अनिवासी करदात्यांनाही हे लागू होणार नाही. जर दोन्ही कलम 206AA (पॅन नसल्यास बाबतीत जास्त टीडीएस दर) आणि 206AB लागू असेल तर टीडीएस दर वरील नमूद केलेल्या दरापेक्षा जास्त असेल. त्याचबरोबर, कलम 206 सीसी आणि 206 सीसीए अंतर्गत अधिक टीसीएस लागू होतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा