Breaking

सोमवार, २६ जुलै, २०२१

शिवाजी विद्यापीठाच्या मार्च / एप्रिल 2021 उन्हाळी सत्रातील परीक्षेचे अर्ज भरणेस मुदतवाढ : मा.गजानन पळसे,प्र.संचालक


मा. गजानन पळसे,संचालक


 प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


     शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील मार्च /एप्रिल 2021 उन्हाळी सत्रातील परीक्षेचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी आरव्हीसी/ 617 दि. 26/07/2021सदंर्भीय पत्रानुसार तारखा प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सर्व महाविद्यालये / मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ अधिविभाग स्तरावर विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज स्विकारण्याची कार्यवाही सुरू आहे.      

     तथापि राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमूळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील मार्च / एप्रिल 2021 उन्हाळी सत्रातील परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरण्याबाबत व महाविद्यालयाने परीक्षा याद्या तयार करण्याबाबत खालीलप्रमाणे सुधारित तारखा प्रसिध्द करण्यात येत आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

     👉🏼 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अथवा पदव्युत्तर अधिविभागामध्ये परीक्षा अर्ज भरावयाच्या तारखा👇 


👉🏼 विनाविलंब शुल्क👇

दि. 27.07.2021 ते 30.07.2021

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाविद्यालयांनी विद्यापीठामध्ये परीक्षा अर्जाच्या यादया तयार करावयाच्या तारखा👇

👉🏼 विनाविलंब शुल्क  03.08.2021

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉🏼 महाविद्यालय अथवा पदव्युत्तर अधिविभागाने परीक्षा अर्ज Online Approve) करण्याच्या तारखा खालीलप्रमाणे👉🏼 दि. 31.07.2021

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

    सबब, सर्व अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता परीक्षा अर्ज भरण्याच्या सुधारित तारखाबाबतचे सदरचे परिपत्रक सर्व संबंधीत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणावे अशी माहिती मा. गजानन पळसे,प्र.संचालक,

परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी परि पत्रकाद्वारे दिली आहे.ll

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा