Breaking

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

दहावीला 44 टक्के मिळविणारे अविनाश शरण जिद्द व परिश्रमाने IAS अधिकारी बनले




नवी दिल्ली, 27 जुलै :  2017 मध्ये बलरामपूर मध्ये कलेक्टर असताना अविनाश शरण यांनी आपली मुलगी वेदिका हिला एका सरकारी प्राथमिक शाळेत अ‍ॅडमिशन घेतल्याने चर्चा झाली होती. त्यावेळेस देशभरात त्यांचं कौतुक करण्यात आलं. आयएएस ऑफिसर अविनाश शरण यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलेला आहे. अतिशय सरळ साध्या स्वभावाचे, आपल्या कर्तव्यप्रती जागरूक असणारे अविनाश शरण यांना त्यांच्या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची शाबासकी मिळालेली आहे. अविनाश शरण हे छत्तीसगडच्या UPSC बॅचचे आयएएस अधिकारी (IAS Officer) आहेत. ते सोशल मीडियावरील (Social Media) एका पोस्टमुळे खूप चर्चेमध्ये आलेले होते अविनाश शरण यांना दहावी मध्ये केवळ 44 % मार्क होते असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता.

    2009च्या बॅचचे अधिकारी अविनाश शरण यांनी यूपीएससी परीक्षेमध्ये (UPSC Exam) 77वा रँक मिळवला होता. यांना दहावीमध्ये 44 %, 12 वीमध्ये 65 % आणि ग्रॅज्युएशनमध्ये 60 % मार्क होते. अविनाश शरण सोशल मीडियावर अत्यंत अ‍ॅक्टिव्ह आहेत. ट्विटरवर (Twitter) ते कायम आपली प्रतिक्रिया देत असतात. त्यांच्या टक्केवारीवरुन सुरू असलेल्या चर्चेवर स्वतः अविनाश शरण यांनी उत्तर दिले आहे.

    ते म्हणतात, माझ्या अभ्यासातल्या कामगिरीबद्दल एक पोस्ट व्हायरल होत आहे. अनेक जणांनी उत्तर देण्याची विनंतीही केली होती. मला खरंच एवढे मार्क होते. पण, याचा अर्थ असा नाही की अभ्यास न करताही पास होता येरे.

    त्यांनी अभ्यासामध्ये कमी मार्क असल्याचं ट्विटरवर कबूल करत विद्यार्थ्यांना मात्र अभ्यास करण्याचा सल्ला. माझं उदाहरण म्हणजे अभ्यास न करण्याचा कोणताही बहाणा असू शकत नाही असं त्यांनी ट्विटरवरून पोस्ट करत सांगितलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा