Breaking

गुरुवार, २९ जुलै, २०२१

"टाकळीवाडीचे वीर जवान प्रशांत निर्मळे यांच्या पार्थिवास राज्यमंत्री यड्रावकरानी दिली आदरांजली ; सैन्य दलाच्या वतीने पार्थिवाला मानवंदना"



 गीता माने-चिगरे : सहसंपादक


🔴 वीर जवान प्रशांत निर्मळे यांच्या अंत्ययात्रेची वैशिष्ट्ये :👋


● राज्यमंत्री यड्रावकरांनी निर्मळे परिवाराची घेतली भेट 

● निघालेल्या अंत्ययात्रेत घेतला सहभाग

● राज्यमंत्री यड्रावकरांनी पाणावलेल्या डोळ्यांनी वाहिली आदरांजली

●अमर रहे, अमर रहे, प्रशांत निर्मळे अमर रहे  या घोषणेने सारा परिसर दुमदुमला●

●गावकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला 

● महिलांची उपस्थिती प्रचंड व सर्वत्र दुःखाचा सागर ●


टाकळीवाडी-: शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी त्याच्या खालोखाल टाकळीवाडी ही गावे सैनिकांची गावे म्हणून प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर ही या दोन्ही गावाचा इतिहास हा देशप्रेमाच्या व बलिदानाच्या जाज्वल्याने भारावून गेलेला आहे. या दोन्ही गावाचा इतिहास म्हणजे  देश प्रेमापायी व सुरक्षितेसाठी सैन्यदलात भरती होणे व प्रसंगी कामी येणे हा येथील तरुणांचा स्वभाव वैशिष्ट्ये बनलेला आहे. याच पवित्र मातीतून जन्म घेतलेले वीर जवान प्रशांत निर्मळे यांचे याच उदात्त भावनेने त्यांचे व्यक्तिमत्त्व बनलेलं होते. त्यातून त्यांना सैन्यदलात नोकरी मिळाली आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या श्वासापर्यंत मनापासून देशसेवा करीत होते. मात्र दुर्दैवाने सैन्यदलातून सुट्टीवर घरी येण्यासाठी निघालेल्या टाकळीवाडीच्या सुपुत्राचे वीर जवान प्रशांत निर्मळे यांचे अपघाती निधन झाले होते.गुरुवारी त्यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी टाकळीवाडी येथे आणण्यात आले.


    सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी या ठिकाणी उपस्थित राहून जवान प्रशांत निर्मळे यांच्या पार्थिवास पुष्पमाला अर्पण करीत अभिवादन केले आणि डबडबलेल्या डोळ्यांनी आदरांजली वाहिली


    वीर जवान निर्मळे यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सैन्यदलाच्या गाडीतून निघालेल्या जवान निर्मळे यांच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला.प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार श्री.आरगे, सैन्य दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते. अमर रहे, अमर रहे, प्रशांत निर्मळे अमर रहे अशा घोषणा देत अंत्ययात्रा टाकळीवाडी गावांमधून काढण्यात आली होती.लहान थोर, युवक, वडीलधारी मंडळी आणि महिलांसह संपूर्ण गाव अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. टाकळीवाडी गावावर शोककळा पसरली होती.  भावनामय वातावरणात ही अंत्ययात्रा निघाली असताना गावकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता. ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून जवान निर्मळे यांना आदरांजली वाहिली.

    सैन्य दलाच्या वतीने जवान प्रशांत निर्मळे यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली.शोकाकुल वातावरणात जवान निर्मळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा