Breaking

शनिवार, १७ जुलै, २०२१

कोल्हापूर जिल्ह्यात पोवळा ( 'कॅस्टोज कोरल स्नेक') या विषारी सर्पाची पहिल्यांदाच नोंद

पोवळा सर्प - (फोटो सौजण्य.मयुर जाधव)


      कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिह्यातील आंबोली येथे आढळनाऱ्या पोवळा/ कॅस्टोज कोरल स्नेक ( Castoe’s coral snake) या सापाची पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात नोंद करण्यात आली आहे.  आजरा तालुक्यामधील होनेवाडी व मडिलगे या ठिकाणांवरुन या सर्पाची  नोंद घेण्यात आली आहे. 

      सातारा जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालया'चे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओंकार यादव,  शिवाजी विध्यापीठाचे विद्यार्थी  मयूर जाधव, स्वप्नील असोदे, सौरभ किनिंगे आणि शुभम कुरुंदवाडकर  यांनी ही नोंद केली आहे. 'Reptiles and Amphibians' या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेमध्ये ही नोंद प्रसिद्ध झाली आहे. या सर्पाची ओळख करण्यात सरीसृप शात्रज्ञ डॉ. वरद गीरी यांची मदत मिळाली.

     

शोधपत्रिका

 सापाची वैशिष्टे - कॅलियोफिस (calliophis) जातीचा हा साप विषारी असुन त्यामध्ये मज्जातंतू वर परिणाम करणारे विष असते (neurotoxic venom). याची लांबी 10 ते 15 सेंटिमीटर असते. रंग- पाठ चाॅकलेटी व पोटाकडची बाजू लालसर रंगाची. अधिवास - पालापाचोळा व दगडाखाली असतो. परंतु आकाराने लहान असल्यामुळे मनुष्यास जास्त धोका नसतो.

      यापूर्वी या सापाची नोंद सिंधूदुर्ग (महाराष्ट्र) जिल्ह्यातील आंबोली, गोवा आणि कारवार (कर्नाटक) येथून केलेली होती. या नव्या नोंदीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात आढळणाऱ्या सापांच्या यादीत भर पडली आहे. 

       

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा