Breaking

शनिवार, १७ जुलै, २०२१

कोरोना काळात रक्तदान शिबिर व रक्तदान करण्याचे आव्हान : कुलगुरू,डॉ.डी.टी.शिर्के

 

डॉ.डी.टी.शिर्के, कुलगुरू

शिवाजी विद्यापीठात रक्तदान शिबिराचे आयोजन


प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


   "शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व लोकमत समुह यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कुलगुरू, डॉ.डी.टी.शिर्के, यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर व राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा.अभय जायभाये व  संतोष मिठार,लोकमत सरव्यवस्थापक हे उपस्थित होते.

     सुरुवातीस कुलगुरू,डॉ.डी.टी.शिर्के यांनी दिपप्रज्वलन करून उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले, कोरोना महामारी च्या परिस्थितीला सामोरे जाताना या बिकट प्रसंगी विविध समूहाने रक्तदान शिबिराचे आयोजन व  रक्तदान करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहन केले.


    कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता रक्ताच्या तुटवडा भासत असून अशावेळी मा.मुख्यमंत्री व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने वारंवार रक्तदान  करण्याचे आव्हान केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच सामाजिक भान व जबाबदारी म्हणून विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व लोकमत समूह यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने आपला सक्रिय सहभाग नोंदवून रक्तदान केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कक्ष  व शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने आवाहन केल्याप्रमाणे असंख्य रक्तदात्यांनी प्रतिसाद देत रक्तदानाचे पवित्र काम करून सामाजिक संवेदनशीलता दर्शविली. या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने प्रातिनिधिक रक्तदात्यांना  प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव मा.कुलगुरू, प्र- कुलगुरू व लोकमत समूहाचे सरव्यवस्थापक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


      सदर रक्तदान शिबिराच्या वेळी लोकमत समूहाचे दिपक मनरकर, देशमुख साहेब,विक्रांत देसाई त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे प्रमुख प्रतिनिधी अतुल एतावडेकर, शशिकांत साळुंखे,सुरेश पाटील, दिपक काशिद,सदानंद माने, विजय पाटील व राजेश चव्हाण तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे संग्राम मोरे,  डॉ.प्रभाकर माने,प्रा.मनोहर कोरे,प्रा. बोथिकर, राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे सर्व कर्मचारी वर्ग व स्वयंसेवक विद्यार्थी शासनाच्या नियमांना अधिन राहून हे शिबिर यशस्वीपणे राबविले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा