![]() |
ईशान किशन |
कोलंबो: भारतीय क्रिकेट संघातील विकेटकीपर फलंदाज इशान किशनने आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये धमाकेदार पदार्पण केले आहे. इशान किशनने वाढदिवसादिवशी भारताकडून पदार्पण केले. या सामन्यात इशानने इतिहास घडवला.
वनडे क्रिकेटमध्ये इशानने पहिल्या चेंडूवर श्रीलंकेचा गोलंदाज धनंजयला शानदार षटकार मारला. या षटकारासह त्याने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजवर कोणाला न जमलेली कामगिरी केली. वनडे क्रिकेटच्या पदार्पणात पहिल्या चेंडूवर षटकार आजवर कोणी मारला नाही. टी-२० मध्ये अशी कामगिरी सूर्यकुमार यादवने केली आहे. पण वनडेत ही कामगिरी इशानच्या नावावर नोंदली गेली. इशानने टी-२०च्या पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २६३ धावांचे लक्ष्य दिले. पृथ्वी शॉने भारताला धमाकेदार सुरुवात करून दिली. पण तो ४३ धावा करून माघारी परतला. पृथ्वीच्या जागी इशान किशन फलंदाजीला आला. त्याने पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारला.
5⃣0⃣ on T20I debut ✅
— BCCI (@BCCI) July 18, 2021
5⃣0⃣ on ODI debut ✅@ishankishan51 knows a thing or two about making a cracking start 💪 💪 #TeamIndia #SLvIND
Follow the match 👉 https://t.co/rf0sHqdzSK pic.twitter.com/i4YThXGRga
याच बरोबर पदार्णाच्या वनडेत आणि टी-२० मध्ये मिळून पदार्णात ५० हून अधिक धावा करणारा इशान हा रॉबिन उथप्पानंतरचा दुसरा फलंदाज आहे. वनडेतील पदार्पणाचे अर्धशतक कमी चेंडूत करणाऱ्या फलंदाजात इशान किशन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ३३ चेंडूत ५० धावा केल्या. या यादीत क्रुणाल पंड्या पहिल्या स्थानावर आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध २६ चेंडूत अर्धशतक केले होते.
भारताकडून वाढदिवसा दिवशी पदार्पण करणारा इशान हा दुसरा खेळाडू आहे. आधी असे पदार्पण फक्त एका खेळाडूने केले होते. गुरशरण सिंह यांनी ८ मार्च १९९० रोजी हेमिल्टन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. गुरशरण यांनी खेळलेला ती एकमेव मॅच होती.आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत १६ जणांनी स्वत:च्या वाढदिवसा दिवशी पदार्पण केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा