Breaking

मंगळवार, २० जुलै, २०२१

गुरुरूपी बहुआयामी व्यक्तिमत्व व ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अनंत मनोहर काळाच्या पडद्याआड ; त्यांच्या लेखणीला सलाम व स्मृतीला अभिवादन

 

 कालवश प्रा. अनंत मनोहर


 प्रसाद कुलकर्णी : सरचिटणीस समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी (संपादक,लेखक साहित्यिक व विचारवंत)


    महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील एक ध्रुवतारा म्हणून ओळखळे जाणारे बहुआयामी व्यक्तिमत्व व ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अनंत मनोहर काळाच्या पडद्याआड गेले.

     ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अनंत मनोहर वयाच्या ९२ व्या वर्षी पुणे येथे शनिवार दिनांक १७ जुलै २९२१ रोजी कालवश झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य व क्रीडा क्षेत्रातील एक जाणकार व्यक्तिमत्त्व आपण गमावललो आहोत. मूळचे कोकणचे असलेले मनोहर सर नोकरीच्या निमित्ताने साठ वर्षांपूर्वी बेळगावला आले आणि बेळगावकर झाले. बेळगावच्या राणी पार्वती देवी महाविद्यालयात ते मराठी विषयाचे प्राध्यापक विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. एका अतिशय शिस्तबद्ध आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असा त्यांचा नावलौकिक होते. त्यांचे सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी त्यांच्या निवृत्तीनंतर गेल्या तीस वर्षात त्यांच्याबद्दल अतिशय ममत्वाने बोलायचे.

      साहित्य क्षेत्रात त्यांनी कथा आणि कादंबरी या मध्ये बहुविध स्वरूपाचं प्रचंड व उत्तम लेखन केले. महाभारतातील युधिस्टर या पात्रावर 'ज्येष्ठ' ही कादंबरी त्यांनी लिहिली. त्याचबरोबर इतरही स्वरूपाचं लेखन करून ७५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विविध वृत्तपत्रात सातत्याने स्तंभलेखन करीत असत. साहित्यातील भैरू रतन दमाणी सह अनेक मानाचे पुरस्कार त्यांनी कर्तुत्वावर मिळवले होते. मराठीचे प्राध्यापक असूनही इंग्रजी व अत्यंत कमालीचं प्रभुत्व होतं त्यातूनच त्यांनी अनेक पुस्तकांचे मराठी भाषांतरही केले होते. 

     मनोहर सरांचा क्रिकेट हा  जिव्हाळ्याचा विषय असून ते मुलाबरोबर मैदानातच क्रिकेट

मय होऊन जात तसेच त्यांनी क्रिकेटविषयक अनेक वर्ष वृत्तपत्रीय लेखन केले. गावस्कर, कपिलदेव व सचिन यांच्यावर त्यांनी पुस्तके लिहिली. क्रिकेट हा त्यांचा केवळ आवडीचा नव्हे तर अतिशय सखोल अभ्यासाचा विषय होता. याचबरोबर साहित्यिक म्हणून माझा त्यांचा ऋणानुबंध होता गेल्या २५ वर्षातील बेळगाव मधील माझ्या अनेक कार्यक्रमांना सर जातीने उपस्थित राहायचे त्या प्रसंगी त्यांनी केलेलं कौतुक माझ्या दृष्टीने आनंददायी व प्रेरणादायी होते.

      मनोहर सरांच्या निधनाने एक थोर शिक्षक साहित्यिक, अनुवादक, क्रीडापटू व सामाजिक कार्यकर्ता गमावला आहे याचं मोठं दुःख मला व संपूर्ण साहित्य क्षेत्राला होत आहे. त्यांच्या आचार-विचार व स्मृतींना विनम्र अभिवादन.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा