![]() |
संग्रहित |
कोल्हापूर : बाचणी (ता. कागल) येथील उच्च विद्युत वाहिनीची तार माय लेकरांच्या अंगावरती तुटून पडल्याने शॉक लागून मृत्यू झाला. गीता गौतम जाधव (वय 32 ) व हर्षवर्धन गौतम जाधव (वय 14) असे मृत्युमुखी पडलेल्या माय लेकरांची नावे आहेत. दरम्यान यामध्ये भक्ती गौतम जाधव ही बारा वर्षाची चिमुरडी बचावली. आणि तिच्यामुळेच या घटनेची माहिती घरी समजली.
मंगळवार (ता. २०) रोजी सकाळी आकरा वाजता ओढ्याला कपडे धुवून परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली.प्रथम आईच्या अंगावर ही तार पडल्यावर आईची मदत करायला गेलेल्या मुलाचाही शॉक लागून मृत्यू झाल्याचे समजत आहे. या माय-लेकरांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महावितरणकडून संबंधित कुटुंबाला अंत्यविधीसाठी तातडीची मदत दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा