अश्विनी शिंदे : जयसिंगपूर प्रतिनिधी
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळाच्या वैशाली बुद्ध विहार धम्मनगरच्या संस्थेला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर मा. विशाल लोंढे यांनी भेट दिली.शासकीय अनुदानातून निर्माण होत असलेल्या राजगृह या सांस्कृतिक सभागृहाच्या प्रलंबित बांधकामाच्या निमित्ताने त्यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक लेखाधिकारी अरविंदर रंगापुरे, वरिष्ठ निरीक्षक प्रताप कांबळे उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ ही दक्षिण भारतातील बौद्ध धर्म प्रचार प्रसार करणारी संस्था आहे. गेली तीस वर्षापासून अविरतपणे बौद्ध धम्म महापरिषदला समाजाच्या ज्ञानी व त्यागी भिक्खू संघाच मार्गदर्शन होत आहे. समाज प्रबोधन, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर व महापुरुषांच्या विचारांचा संमेलन यातून समाजाला उत्तम आचरणशील दिशा देण्याचे काम या मंडळाकडून सातत्याने होत आहे. या मंडळाच्या कार्यक्रमांना आजतागायत देश-विदेशातील भिकू संघाबरोबर महाराष्ट्राच्या तीन मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले असून संस्थेच्या दृष्टीने ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
सदर भेटीमुळे बोलताना सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे म्हणाले की,मंडळाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध कामांची व राजगृह या सांस्कृतिक सभाग्रह प्रलंबित कामाची पाहणी करण्यासाठी ही भेट दिली आहे. त्यानंतर या संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेला उपक्रमाचं मनापासून कौतुक केले.२०१४ साली मंजूर झालेल्या या प्रोजेक्टचं काम प्रलंबित असून त्या दृष्टीने पहाणी करून पुढील ध्येय धोरणे ठरवणे व शासनाकडून प्रलंबित असलेला निधी उपलब्ध करून हा प्रोजेक्ट पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
यापुढे ते म्हणाले की, एक आठवड्यानंतर PWD अधिकाऱ्यांची भेट घडवून आणणार आहे आणि मंडळाला अपेक्षित असलेल्या सर्व प्रलंबित कामे पूर्णत्वास नेणार आहे.तसेच पुढील एक वर्षामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होईल अशी कामाची आखणी करण्यात येईल.
सहाय्यक आयुक्तांच्या भेटी वेळी मंडळाचे अध्यक्ष रमेश कांबळे, उपाध्यक्ष बल्लाळ, सचिव शशिकांत माळगे, सचिव प्रा.डॉ.धनंजय कर्णिक, खजिनदार अनिल वर्धन,माजी अध्यक्ष शामराव आळतेकर, गणपती कांबळे, विश्वास वाडीकर,श्रीपती कांबळे,विद्याधर बिडकर, दीपक कामत,अमरदीप कांबळे,राजू ढाले,राजेंद्र सामंत,नागसेन कांबळे, शशिकांत कांबळे,धनपाल कांबळे, बी.जी.कांबळे,रघुनाथ कुरणे ,श्रीकांत देसाई व मंडळाचे विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीने संस्थेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य व समाज बांधवांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा