Breaking

गुरुवार, २९ जुलै, २०२१

गोडीविहीर तालीम मंडळ (अध्यक्ष प्रेमी) शिरोळ त व हरबा तालीम मंडळ मौजे आगर यांच्याकडून कोथळीतील ३०० पूरग्रस्तांना जेवणाची सोय

 


जीवन आवळे : कोथळी प्रतिनिधी


कोथळी येथील पूरग्रस्तांना सामाजिक भान राखत गोडीविहीर तालीम मंडळ (अध्यक्ष प्रेमी) शिरोळ तालुका व हरबा तालीम मंडळ मौजे आगर यांच्याकडून पूरग्रस्तांची जेवणाची सोय करण्यात आली. पूरग्रस्तांचे होत असलेल्या आतोनात हाल ओळखून या मंडळाने पुढाकार घेत पूरग्रस्तांची जेवणाची सोय करून दिली. अशाच प्रकारे इतरही मंडळांनी पुढाकार घेऊन मदत करण्याची गरच आहे. 

    गोडीविहीर तालीम मंडळ (अध्यक्ष प्रेमी शिरोळ) तालुका व हरबा तालीम मंडळ मौजे आगर या मंडळाने केलेल्या अन्नाच्या मदतीची सर्व स्तरातून प्रशंसा केली जात आहे. पूरग्रस्तांना या मंडळाने उत्तम जेवणाची सोय करून दिल्याबद्दल पूरग्रस्तांनी त्यांचे आभार मानले.

        यावेळी संतोष खामकर (नाना) मानवा अधिकार सुरक्षा संघ दिल्ली कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष,

परशुराम कोळेकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, संभाजी भोसले हुमान राइट्स उपाध्यक्ष, राजू भोसले शिरोळ तालुका उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राघव लंगरे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण डुबल अभिषेक आडके, तुषार साळुंके, गजानन लंगरे, गणेश कांबळे, सुशील भोसले, अवधूत जाधव, योगेश कणसे, ऋषिकेश विभुते, शुभम काळे व पूरग्रस्त उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा