Breaking

मंगळवार, २७ जुलै, २०२१

चिपरी येथे मुंबई दारू बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल*




 प्रविणकुमार माने : उपसंपादक


माळवाडी,चिपरी ता. शिरोळ जि.कोल्हापूर येथे एकावर जयसिंगपूरपो लीसांनी  मुंबई दारू बंदी कायद्या अंतर्गत कारवाई केलेली आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की, माळवाडी, चिपरी येथील महादेव गणपती गोफणे वय वर्ष 61या संशयिताने दि.25/07/2021 रोजी 17.20 वा.सुमारास त्याचे राहते घराच्या मागील बाजूस उघड्यावरच महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या लाॅकडाउनच्या आदेशाचा भंग करून,मास्कचा वापर न करता ,शासकीय नियमांचे पालन न करता,कोरोना रोगाचा  प्रसार होण्याच्या दृष्ट हेतूने स्वार्थासाठी तो त्याच्या राहते घराच्या मागील बाजूस उघड्यावरच जी.एम.डाॅकटर कंपनीची,टँगो पंच कंपनीची आणि रेठरा कंपनीची देशी दारू विनापरवाना व बेकायदेशीरपणे विक्री करणेच्या उद्देशाने कब्जात बाळगून त्यांची विक्री करीत असताना मिळून आलेने जयसिंगपूर पोलीसांनी त्याच्याविरूदध गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपीकडून एकूण 4264  रूपये किंमतीचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला  आहे. सदर गुन्हयाचे कामी मा.पोलिस ना.निकमसाहेबांनी तपास केलेला आहे.

       जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या या धडक कारवाईने चिपरी गावात आनंद व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा