प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
जयसिंगपूर पोलीस ठाणेच्या वतीने दानोळी येथील पूरग्रस्त नागरिकांना जेवण देऊन महापुराच्या संकट काळात मदत केली आहे. यावेळी जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे उपस्थित होते.
जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने सातत्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या नेतृत्वाखाली कायदा व सुव्यवस्थेच्या कर्तव्याबरोबर सामाजिक कार्याची मालिका सुरू केली आहे. सोमवार दिनांक २६ जुलै २०२१ रोजी दानोळी येथील एका शाळात आश्रयासाठी आलेल्या विस्थापित पूरग्रस्तांसाठी खाकी वर्दीतील मानवतावादी विचारांचे व सामाजिक भान असणाऱ्या या मंडळीनी जेवणाची व्यवस्था करून एक समाजाभिमुख कार्य केले आहे. यावेळी पूरग्रस्त नागरिकांनी समाधान व्यक्त करून मान्सून कौतुक केले.
या उपक्रमामुळे दत्तात्रय बोरीगिड्डे,जयसिंगपूर पोलीस ठाणेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा