हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगेसह प्रमुख नद्यांनी गुरुवारी इशारा पातळी ओलांडली असून आता त्या धोका पातळीच्या दिशेने वाहत आहेत. जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. ‘एनडीआरएफ’च्या बचाव कार्याला सुरुवात केली आहे. आणखी दोन दिवस मोठा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पूरग्रस्तांच्या स्थलांतराला सुरुवात केली आहे.
कोल्हापुरातील मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढत असल्याने पुराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना आवाहन केले आहे.
“२०१९ च्या महापूरावेळी राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ५५.६ फुट होती. त्यावेळी महापूराचा त्रास झाला होता याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. आज दुपारी ही पातळी ५३.६ फूटांपर्यंत पोहोचली आहे. ही पातळी ५५.६ पेक्षाही पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१९ पेक्षा याची तीव्रता जास्त असणार आहे. २०१९ पेक्षा मोठा पूर येण्याची शक्यता आहे, तरी २०१९ च्या वेळी पूरबाधीत झालेल्या घरातील लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची भूमिका घ्यावी. जिल्ह्यातील सर्व आणि शहरातील सर्व लोकांना विनंती आहे की प्रशासनाला सहकार्य करावं”, असं पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
कोल्हापुरातील मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढत असल्याने पुराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री @satejp
यांनी कोल्हापूरकरांना केलेले आहे.
“जिल्ह्याला उद्या हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने पडणाऱ्या पावसाचा परिणाम प्रचंड होणार आहे. कदाचित उद्या सकाळी राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले जातील. त्यातून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे आजची रात्र खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आजच सुरक्षित ठिकाणी जावं. तसेच शहरातील नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येऊ नये,” अशी विनंती पालकमंत्र्यांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवस वेधशाळेने ‘रेड अलर्ट’ दिला होता. जिल्ह्यात सलग चार दिवस धो धो पाऊ स कोसळत आहे. पावसाची गती वाढल्याने येथील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली. नदीच्या पाण्याची वाढती गती पाहता आज रात्री ती धोका पातळी ओलांडणार असल्याचा अंदाज आहे. याशिवाय, जिल्ह्यातील दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या नद्याही इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा