Breaking

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

महापुराच्या संभाव्य पार्श्वभूमीवर कोथळी येथील पूरग्रस्त ग्रामस्थांची कब्जा पट्टीची मागणी

 


जीवन आवळे : कोथळी प्रतिनिधी


कोथळी : येथे शिरोळ तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी भेट देऊन संभाव्य पुराच्या पाण्याचा आढावा घेत, लोकांशी संवाद साधला यावेळी लोकांनी  पूर बाधितांना मंजूर झालेल्या जमिनीचे कब्जा पट्टी मिळावी असा आग्रह तहसीलदार यांच्याकडे धरला.        

       जोपर्यंत कब्जा पट्टी मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही अशी भूमिका घेतल्याने प्रश्न आणखी चिगळत गेला. 2005 चा महापूर  व  2019 चा महापूर असो अशा महापुरामध्ये सतत मातंग व बौद्ध  हे दोन्ही समाज 100% पूर बाधित होतात. या समाजघटकांनी आम्हाला आमच्या प्लॉटची कब्जापट्टी मिळावी अशी तहसीलदार मॅडम यांच्याकडे मागणी केली. यावर तहसीलदार मॅडम यांनी कब्जा पट्टी वरती भाष्य न करता सध्याच्या महापूराची संभाव्य परिस्थिती विचारात घेऊन लोकांनी सुरक्षित स्थळी जाण्याचे आव्हान केले.




    यावेळी शिरोळ पंचायत समितीचे उपसभापती राजगोंडा पाटील, सरपंच ऋषभ पाटील, सदस्य नितीन वायदंडे, शरद कांबळे इत्यादी सदस्य व ग्रामस्थ  उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा