हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पुराच्या पाण्याने वेढा देण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूरची परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे.
पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराची भीती निर्माण झाली आहे.
पुणे-बंगलोर महामार्गावरील तावडे हॉटेल ते सांगली फाटा मार्गावरील सर्व शोरूम,गॅरेज, मंगल कार्यालये,हॉटेल्स व ढाबा पाण्याखाली गेले आहेत. महामार्गावरील दोन्ही बाजूचे सर्विस रोड बंद करण्यात आले असून सर्व्हिस रोडवर किमान चार ते साडेचार फूट पाणी आले आहे.
सांगली फाट्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापनाचे टीम सज्ज आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे ,पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण व पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण भोसले यांच्यासह 100 पोलीस महामार्गावर बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा