करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी
तमदलगे : ट्रेकिंग पॉइंट असणाऱ्या तमदलगे येथील तलाव आज तुडुंब भरून वाहत आहे. सतत तीन दिवस होणाऱ्या मुसळधार पावसामुळे तमदलगे येथील तलाव ओव्हर फ्लो झाला . साधारण सायंकाळी ५ वाजता तलाव सांडव्यातून प्रवाहीत झाला.अजूनही पावसाचा जोर काही कमी होताना दिसत नाही .
तसेच शेजारील तीन गावे या पाझर तलावावर अवलंबून आहेत तलाव तुडुंब भरल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येते.तमदलगे,निमशिरगाव व जैनापुर या गावांना पाझरतलावतून पाणीपुरवठा होतो व शेतीला पाणी पुरवले जाते.त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मध्ये आंनद ओसंडून वाहत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा