Breaking

शनिवार, २४ जुलै, २०२१

कोथळी येथे पूरग्रस्तांना कब्जापट्टी मिळावी म्हणून पूरग्रस्त मातंग समाज व बौद्ध समाज यांच्या वतीने निदर्शने व जलसमाधी घेण्याची भूमिका



 जीवन आवळे : कोथळी प्रतिनिधी


कोथळी : ता.शिरोळ जि. कोल्हापूर येथे पूरग्रस्त नागरिकांचा प्रशासनाविरुद्ध आक्रोश असून पूरग्रस्तांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

     कोथळी कोथळी गावात सन 2019 ची महापूराची पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र दिसून येत असून प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नसल्याचा आक्रोश लोकांमध्ये मोठा दिसून येत आहे. 2005 तसेच 2019  महापूरा प्रमाणे या वेळी ही लोकांना हाल होत असून, कब्जापट्टी मिळावी म्हणून ग्रामपंचायत येथे पूरग्रस्त मातंग समाज व बौद्ध समाज यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. 



      लोकांचा आक्रोश मोठ्या प्रमाणात असताना  प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पूरग्रस्तांना केला आहे. त्यामुळे कोथळी ग्रामपंचायतीला घेराव घालत ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत केंबले यांनी तहसीलदार डॉ.अपर्णा मोरे- धुमाळ यांना फोन लावत पूरग्रस्तांची वेदना सांगितली.तसेच शिरोळ पंचायत समितीचे उपसभापती राजगोंड पाटील यांनी तहसीलदार मॅडम यांना लोकांचे होत असलेल्या गंभीर प्रश्नाविषयी लक्ष वेधून त्यांना कब्जा पट्टी मिळावी याकरिता मागणी केली.


       तसेच पूरग्रस्त राहत असलेल्या भागांमध्ये लाईटची सोय करण्याबाबत विचारना  केली. तसेच काल तहसीलदार मॅडम यांनी कोथळीला  दिली होती परंतु कब्जापट्टी बाबत कोणतेही भाष्य न केल्यामुळे आज पूरग्रस्त मातंग समाज व बौद्ध समाज हे पाण्यामध्ये जाऊन जलसमाधी घेण्याच्या मतावर ठाम आहेत.  जोपर्यंत कब्जापट्टी मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाण्यातून बाहेर येणार नाही अशी पूरग्रस्त लोकांनी भूमिका घेतली आहे. तरी प्रशासनाने वेळेच याकडे लक्ष द्यावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे. 

     यावेळी  सरपंच ऋषभ पाटील, सदस्य नितीन वायदंडे, जीवन तिवडे, आदम तिवडे तसेच पूरग्रस्त मोठया संख्येने सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा