जीवन आवळे : कोथळी प्रतिनिधी
शिरोळ : नामदार अजितदादा पवार यांनी आज मंगळवारी सकाळी शिरोळ तालुक्यात येऊन शिरोळ व अर्जुनवाड या गावांना भेटी देत पूर परिस्थितीचा आढावा घेतला व येथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही देत महापुरामुळे नुकसान झालेल्यांना शासन नुकसानभरपाई देण्यासाठी लवकरच धोरण जाहीर करेल असे सांगितले.यावेळी नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या व्यथा अजितदादांच्या समोर मांडल्या.
सदर भेटीस नामदार हसन मुश्रीफ,नामदार जयंत पाटील,नामदार सतेज पाटील,खासदार धैर्यशील माने,आमदार राजूबाबा आवळे,विभागीय आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी राहुल रेखावर,पोलीस महानिरीक्षक एस.एम. लोहिया,जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड,प्रांताधिकारी विकास खरात,तहसीलदार डॉ.अपर्णा मोरे-धुमाळ यांच्यासह शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा