Breaking

सोमवार, २६ जुलै, २०२१

अखेर चौथ्या दिवशी पुणे बंगळूर महामार्ग वाहतूकीसाठी खुला



हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी


पुणे- बंगळूर महामार्ग अखेर चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी दहा वाजता वाहतुकीस खुला झाला आहे. पुणे- बंगळूर महामार्ग खुला झाल्याने अडकून पडलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली. महापुराने पुणे बंगळूर महामार्ग व्यापून टाकला होता. शुक्रवारी सायंकाळी महामार्गावर काही ठिकाणी सहा फूट तर काही ठिकाणी दहा फुटांवर पाण्याची पातळी होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा