Breaking

सोमवार, २६ जुलै, २०२१

कोल्हापूर; : पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक सकाळी दहानंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

 



हेमंत कांबळे :  कोल्हापूर शहर प्रतिनिधी


तावडे हॉटेल ते सांगली फाटा या दरम्यानच्या महामार्गावर अजूनही दीड फूट पाण्याची पातळी आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर चाचणी होऊन वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय होईल, असे पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी सांगितले. महामार्गावर पाणी आल्यामुळे चार दिवसांपासून संपूर्ण वाहतूक ठप्प आहे.

शुक्रवारी रात्री महामार्गावर पुराचे पाणी आल्याने प्रथमतः पुणेकडे जाणारा रस्ता बंद करुन एकाच रस्त्याने दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. तर काही कालावधीतच पाण्याची पातळी वाढल्याने सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती.

दरम्यान, रविवारी दुपारी जेसीबी पाठवून पाण्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. पण मध्यावर जेसीबी गेल्यानंतर पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे जेसीबीही परत माघारी घ्यावा लागला.

शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण भोसले यांनी सोमवारी रस्त्यावरुन अत्यावश्यक वाहने सोडण्यात येतील असे सांगितले होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा