प्रविणकुमार माने : उपसंपादक
टाकवडे : येथील मराठी शाळेतील पूरग्रस्त नागरिकांची मनसे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तथा शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते भगवंत (दादा) जांभळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे कोल्हापूर जिल्हा संघटक संजय (आबा) भंडारे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षा सौ.सिंधुताई शिंदे व जयसिंगपूर शहराध्यक्ष निलेश उर्फ लखन भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भेट घेतली.
यावेळी शिरोळ तालुका महिला आघाडी दक्षिण विभाग तालुकाध्यक्षा सौ.शकुंतला कांबळे यांच्यासह अकरा पूरग्रस्त कुटुंबांनी सद्या राहत असलेल्या जागेवर तीन पिढ्यांपासून वास्तव्य असून देखील येथे महापुरामुळे पडझड झालेल्या घरांचे पुनर्बांधकाम व नूतनीकरण करण्यास ग्रामपंचायत परवानगी देत नसून हा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे पण यावर कोणी लक्ष द्याला तयार नसलेचे सांगितले.
जिल्हा उपाध्यक्ष भगवंत (दादा) जांभळे यांनी येत्या काही महिन्यात हा प्रश्न प्रशासन व शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांना हक्काचे घर व जागा मिळवून देऊ व मनसे पक्ष आणि सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असल्याचे अभिवचन दिले.
या भेटीदरम्यान महिला आघाडी उत्तर विभाग तालुकाध्यक्षा सौ.सुनीताताई मोहिते (पडियार),मनवासे जयसिंगपूर शहराध्यक्ष किरण चव्हाण, सोशल मीडिया जयसिंगपूर शहराध्यक्ष अवधुत तांदळे,टाकवडे महिला आघाडी उपाध्यक्षा परवीन भाभी शेख आदी महाराष्ट्र सैनिक व नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा