Breaking

शनिवार, २४ जुलै, २०२१

उदगाव येथे एकावर गुन्हा दाखल



 प्रविणकुमार माने : उपसंपादक


उदगाव ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथील  एकावर गुटखायुक्त  प्रतिबंधीत पदार्थ विक्रीकरिता साठा केलेला मिळून आलेने त्याच्याविरूदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

      याबाबत अधिक माहिती अशी की,मिरासो उर्फ तोफीक बाळासो नदाफ( रा.फकीर रोड, वरद काॅलनी, उदगाव,ता.शिरोळ,जि कोल्हापूर  ) या आरोपीने महाराष्ट्र् शासनाने मॅग्नेशिअल कारबोनेटसारखा  कारसीनोजेनीक कर्करोग होण्यास कारणीभूत असलेले प्रतिबंधीत पदार्थ विक्री तसेच गुटखा,पानमसाला, सुगंधीत तंबाखू व सुगंधित सुपारी इत्यादी पदार्थावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेची माहिती असताना व पानमसाला व सुगंधि तंबाखू हा नशाकारक व आरोग्यास हानिकारक पदार्थ असलेची माहिती असताना सदर आरोपी हा त्याच्या राहते घरातील कच्चा बांधकामाच्या आतील दोन नंबर चे खोली मध्ये  दि 22/07/2021 रोजी 13.40 वा सुमारास  जाणीवपूर्वक पानमसाला व सुगंधि तंबाखू असे गुटखाजनय प्रतिबंधीत पदार्थ विक्री करिता साठा केलेला मिळून आलेने  त्याच्याविरूद्ध जयसिंगपूर पोलीसांनी भा.दंड.संहिता कलम 188,272 ,273,328 सह अन्न सुरक्षा व मानदे  कायदा 2006 व अंतर्गत   नियम, नियमने 2011चे कलम 26(2)(i), सहवाचन कलम 26(2)(ii),कलम 26(2)(4) सहवाचन कलम 27(3)(e) सहवाचन कलम 30(2)(a) प्रमाणे गुन्हा रजि. नं 270/2021 ने गुन्हा  दाखल केलेला आहे. सदर आरोपीकडून एकूण 14762 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी मा पोलिस उपनिरीक्षक वाघसाहेब यांनी तपास केलेला आहे. सदर प्रकरणी आरोपीस अटक करून मे.न्यायालयात हजर करणेत येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा