Breaking

शनिवार, २४ जुलै, २०२१

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला



 हेमंत कांबळे :  कोल्हापूर शहर प्रतिनिधी


राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे. दरम्यान राधानगरी धरण ९३ टक्के भरले आहे.

मागच्या चोवीस तासात १५९ मिमी पाऊस झाला आहे. जूनपासून आजअखेर २६०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

धरणातून वीजनिर्मितीसाठी १४०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे.

पावसाचा जोर वाढल्यास आज दुपारपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.धरणात ७८१०.१९ द.ल.घ.फु. इतका पाणीसाठा असून पाणी पातळी ३४४.८२ फूट इतकी झाली आहे.

दरम्यान शनिवारी सकाळी सहा वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी ५६ फूट होती. सकाळी सात वाजता हीच पाणीपातळी ५५. १० फुटांवर आली आहे.

    सकाळपासून पाऊस पूर्णपणे थांबला असून सूर्यदर्शन झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या माऱ्याने हैराण झालेले कोल्हापूरकर थोडसे सुखावले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा