रुकडी : येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग,आधार फाउंडेशन रूकडी, ग्रामपंचायत अतिग्रे, आई फाउंडेशन अतिग्रे व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त्त विद्यमाने अतिग्रे येथील ऐतिहासिक तलावाभोवती नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या ५०० वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे, कार्यक्रम अधिकारी डॉ.गिरीश मोरे, डॉ. शंकर दळवी व महाविद्यालयातील इतर शिक्षक आधार फाउंडेशनचे श्री. संदीप बनकर व आधार फाउंडेशनचे सर्व स्वयंसेवक अतिग्रे येथील आई फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य, ग्रामपंचायत अतिग्रेचे सर्व सदस्य, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे रो. यतीराज भंडारी रो. राजू तारदाळे रो. डाॕ.प्रशांत कांबळे अतिग्रेचे रो. प्रशांत गुरव राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा