प्रविणकुमार माने : उपसंपादक
जयसिंगपूर : चिपरी ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथे एकावर जयसिंगपूर पोलीसांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील रामचंद्र सोमा शेळके वय 45 याने मा.जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर यांचे कार्यालयाकडील आदेश क्रां.जा/क्रां.नै.आ./कोरोना विषाणू/ आर.आर.406/2021 कडील दि 17/07/2021अन्वये लागू बंदी आदेशाचा भंग करून कोरोना सारख्या मानवी आरोग्यास हानिकारक ठरलेल्या साथीच्या रोगाचा प्रसार होईल याची कल्पना असतानाही त्यांच्या मालकीची "यश बिअर शाॅपी "ही आस्थापना जाणीवपूर्वक चालू ठेवले असल्याने सदर आरोपीविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर प्रकरणी मा पोलिस .स.ई.वाघसाहेब गुन्हयाचा सखोल तपास करीत आहेत.
जयसिंगपूर पोलीसांच्या या धडक कारवाईमुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. पोलीसांच्या अशा कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा