प्रविणकुमार माने : उपसंपादक
जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथे दोघांवर अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील फिर्यादी पीडित तरुणी जयसिंगपूर येथे राहत असून ही तरूणी व अनुराग जवाहरलाल सालेचा रा.राजीव गांधी नगर, 8 वी गल्ली, जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर हे एकमेकांच्या शेजारी राहणेस असून ते एकमेकांना ओळखतात. सदर तरूणी ही अनुसूचित जातीची असून अनुराग हा उच्च जातीतील आहे. सन 2019 रोजी रात्री 2.वाजता ते मे 2021 चा शेवटचा आठवडयात तरूणीचे राहते घरी तसेच दिनांक 10/07/2021 रोजी दुपारी 04 वाजता तरूणीचे राहते घरासमोर सदर तरूणाने सदर तरूणीस प्रपोज करून तिला लग्नाचे अमिष दाखवून तिची फसवणूक करून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे. तसेच सदर तरूणाची आई सौ. सुनिता जवाहरलाल सालेचा रा.सदर यांची ही तरूणास फूस असून त्यांनीही पीडीत तरूणीस धमकी व शिवीगाळ दिलेने जयसिंगपूर पोलीसांनी त्यांच्याविरूदध आय.पी.सी.आणि अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास मा.रामेशवर वेंजणे उपविभागीय पोलिस अधिकारी, जयसिंगपूर करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा