इचलकरंजी : येथील दे.भ. बा. भा. खंजिरे शिक्षण संस्था संचालित नाईट कॉलेज ऑफ आर्टस् ॲण्ड कॉमर्स, इचलकरंजीमध्ये आयोजित एक दिवशीय ऑनलाईन वेबिनार उत्साहात संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रा.डॉ.सागर माळी उपस्थित होते.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा महाराष्ट्र, शिवाजी विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष कोल्हापूर व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, भूगोल विभाग, रोट्रक्ट क्लब व विवेकवाहिनी या सर्व विभागाच्या सहयोगाने “भूजल साक्षरता महत्त्व आव्हाने आणि जलसंवर्धनाच्या आधुनिक पद्धती” या विषयावर हे वेबीनार आयोजित करण्यात आला होते.
वेबिनारच्या सुरूवातीस श्री.सुनिल शिंदे यांनी प्रास्ताविकामध्ये सदर वेबिनारची भूमिका विशद केली.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.सागर माळी यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून भूजल साक्षरतेच्या अभियानाचे महत्त्व,त्यापुढील आव्हाने व संवर्धन करण्याच्या विविध पद्धतीचा आढावा त्यांनी पॉवर पॉइंट प्रेसेंटेशन द्वारे घेतला. त्यामध्ये त्यांनी अमेरिकेचे ब्रीद वाक्य ”पाणी वाचवा अमेरिका वाचवा” याचा उल्लेख करत पाण्याचे महत्व व पटवून दिले. महाराष्ट्रामध्ये एक तृतीयांश पाण्याची कमतरता आहे म्हणूनच आपल्या सर्वांना जल साक्षरतेची गरज आहे जल साक्षरतेच्या विविध माध्यमांचा उल्लेख करत असताना आपल्या सभोवतालच्या उपग्रहा विषयी माहिती सांगत पाण्याची प्रमाण कशाप्रकारे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला व त्यामध्ये आपणास नियोजन कसे करता येईल. पाण्याचे योग्य नियोजन व वापर यासाठी जमिनीवरील पाण्याचा वापर करत असताना धरण, कालवे, बंधारे, तळे व नद्या यांच्या पलीकडे जाऊन आता भूगर्भातील जलासंबंधीची साक्षरता निर्माण करणे ही काळाची गरज आहे हे त्यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.जी.नारे होते. कार्यक्रमाचे स्वागत व परिचय प्रा. आर. एल. कोरे यांनी केले. प्रा. डॉ. साईनाथ चपळे यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. सामाजिक संवेदनशील व सक्रिय कार्यक्रम अधिकारी डॉ. माधव मुंडकर यांनी आभार मानले. कार्यशाळेचे तांत्रिक संचालन प्रा. सौरभ पाटणकर यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केले. सदर कार्यशाळेसाठी प्रा.अभय जायभाये संचालक राष्ट्रीय सेवा योजना कक्ष कोल्हापूर, मा. ऋषीराज गोसकी जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे मार्गदर्शन लाभले. सदर वेबिनारमध्ये शहर परिसरातील भूजल विभागातील अधिकारी, महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते.
सदर वेबीनारच्या आयोजना बाबत विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा