Breaking

सोमवार, ५ जुलै, २०२१

या देशात होतेय माणसांबरोबर प्राण्यांचेही कोरोना लसीकरण



सॅन फ्रॅन्सिस्को: करोना विषाणूच्या संसर्गापासून होण्यासाठी माणसांचे करोना लसीकरण सुरू आहे. पंरतु, आता करोनाची लागण होऊ नये यासाठी प्राण्यांनाही लस देण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील एका प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना करोना लस देण्यात आली.


अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोमधील बे एरियातील ऑकलँड येथील प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना करोनाची लस देण्यात येत आहे. या प्राणिसंग्रहालयातील अस्वले, वाघांना लस देण्यात आली आहे. या प्राणिसंग्रहालयातील जिंजर आणि मोली हे वाघ लसीकरण केलेले पहिले दोन प्राणी आहेत.



प्राण्यांना देण्यात येणारी ही लस न्यू जर्सी येथील अॅनिमल हेल्थ कंपनी झोएटीसने (Zoetis) तयार केली आहे. ऑकलँड प्राणिसंग्रहालयाने ट्विट करून सांगितले की, झोएटीसच्यावतीने प्राण्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ हजार डोस देण्यात आले आहेत. या लशी २७ राज्यातील जवळपास ७० प्राणिसंग्रहालयात पाठवण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात वाघ, अस्वल, फॅरेट्स (मुंगूसची एक प्रजाती) आदी प्राण्यांना लस देण्यात येणार आहे.




 



 झोएटीसचे वरिष्ठ उपाध्यक्ष महेश कुमार म्हणाले की, गेल्या वर्षी हाँगकाँगमध्ये पहिल्यांदा पाळीव श्वानाला करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्या कंपनीने पाळीव प्राण्यांना देण्यात येणाऱ्या लसीवर काम सुरू केले. हॉंगकॉंगमधील प्रकरण उघडकीस आल्यानंतर लसीवर काम सुरू झाले आणि आठ महिन्यांच्या आत पहिला अभ्यासही पूर्ण झाला. जागतिक आरोग्य संघटनेसमोरही ही माहिती सादर करण्यात आली होती. सध्या पाळीव प्राण्यांना लशीची आवश्यकता नाही. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांचे लसीकरण सुरू असून जेणेकरून संसर्गापासून त्यांचा बचाव होऊ शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा