भारतीय रेल्वेच्या मध्य (भुसावळ) विभागात १३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १५ जुलैपर्यंत ईमेलवर अर्ज करायचा आहे. यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात दिलेल्या नमुन्यानुसार उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
भारतीय रेल्वेच्या मध्य (भुसावळ) विभागात विविध पदांवर भरती निघाली आहे. याअंतर्ग विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी १५ जुलैपर्यंत अर्ज करायचे आहेत. उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीअंतर्गत जीडीएमओ डॉक्टर, इंटेंसिव्हिस्ट आणि फिजिशियन पदांच्या एकूण १३ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी उमेदवाराच्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि पगार असणार आहे. डॉक्टर पदाच्या ८ जागा भरण्यात येणार आहे. इंटेंसिव्हिस्ट पदाच्या ३ जागा भरल्या जाणार आहेत. तर फिजिशियन पदाच्या २ जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. राखीव वर्गातील उमेदवारांना वयातून सवलत मिळणार आहे.
रेल्वेतर्फे हे कॉंट्रॅक्ट कधीही रद्द केले जाऊ शकते. कॉंट्रॅक्ट संपण्याच्याआधी कोणतेही कारण न देता १५ दिवसांची नोटीस देण्यात येईल. ही पदभरती कायमस्वरुपी ठेवण्याबाबत रेल्वे कोणतीही जबाबदारी घेत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा