करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी
तमदलगे: तमदलगे डोंगरावर आनंदासाठी व ट्रेकींगला बहुतांश लोक येत असतात. ट्रेकिंगला येणाऱ्या अशाच एका ग्रुपने आज तमदलगे डोंगरावरील सर्व प्लास्टिक कचरा गोळा करून डोंगर स्वच्छ करण्याचा अभिनव उपक्रम राबविला.विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये लहान मुले ही होती.
इचलकरंजी फिटनेस ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मिळून हे कार्य केले . आरोग्या सोबत पर्यावरणाचे ही संरक्षण झाले पाहिजे यासाठी ते सातत्याने झटत असतात. त्यामुळे ते नेहमी ट्रेकिंगला येताना सोबत कचरा गोळा करण्यासाठी बॅग घेऊन येत असतात. मुळात या ग्रुप मधील सक्रिय सदस्य विशाल चव्हाण यांना ही एक वेगळी कल्पना सुचली. आपण पर्यावरण संतुलनाचा विकास करण्यासाठी एखादा उपक्रम राबवणे गरजेचे आहे यासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला पाहिजे या हेतूला सर्व सदस्यांनी ही या उपक्रमाला सहमती दर्शविली.
वरील हेतूने आज तमदलगे डोंगरावर उत्साहाने व सामाजिक जाणीवेचा भावनेतून सर्व सदस्यांनी ही मोहीम राबविली. या अभियानात सचिन माळी,सचिन माटकर ,संदीप पाटील,डॉ.श्रद्धा घोरपडे,गणेश बावणे,नितीन आवळकर,विवेक कुंभार, श्रीकांत पाटील,अमित कल्सूर हे सर्व सदस्य उपस्थित होते.
या अनोख्या उपक्रमाने पर्यावरण प्रेमी ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नमस्ते 🙏
उत्तर द्याहटवाआमच्या छोट्याशा पर्यावरणपुरक उपक्रमाला आपण इतक्या छान पद्धतीने प्रकाशित केले याचा आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. आपल्या कौतुकामुळे आमच्या सर्व सदस्यांना पुढील उपक्रमासाठी प्रेरणा मिळत राहील.. खूप धन्यवाद व आपल्याही कार्याला खूप खूप शुभेच्छा 💐
अतिशय स्तुत्य उपक्रम
उत्तर द्याहटवा