हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील असंडोली पैकी कुपलेवाड मधील कुपले कुटुंबीय घरची कामे आटोपून झोपी गेली. पण कुपले दाम्पत्यावर मृत्यूची दरड कोसळली. कुपले पती, पत्नीसह दोन मुकी जनावरे या दरडीखाली गाडले गेले. राधानगरी तालुक्यातील असंडोली पैकी कुपलेवाडी येथील घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
राधानगरी तालुक्यातील असंडोली पैकी कुपलेवाडीतील वसंत लहु कुपले वय ५८ व त्यांच्या पत्नी सुसाबाई वसंत कुपले ४२ हे दाम्पत्य सायं.१० नंतर जेवण करून झोपी गेले. साडेअकराच्या सुमारास मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग थेट घरावर आला.
चिखल, मातीसह मोठे दगड घरावर आल्याने कुपले दाम्पत्यासह दोन मुकी जनावरे यामुळे ढिगाऱ्याखाली गाडली गेली
घडलेली घटना उशीरा ग्रामस्थांच्या लक्षात येताच ढिगारा उपसण्याचे काम सकाळी सुरु झाले. दुपारी निद्रावस्थेत असणारे कुपले दाम्पत्य आणी मुकी जनावरे मृतावस्थेत आढळून आली.
झोपी गेलेल्या कुपले दाम्पत्यासह दोन मुक्या जनावरांवर कोसळलेली मृत्यूची दरड काळरात्रच बनली. राधानगरी तालुक्यात संततधार पावसामुळे रस्त्यावर पाणी आल्याने आणी संततधार पावसामुळे बचावकामासह ढिगारा उपसण्यास अडथळे निर्माण होत होते. निद्रावस्थेतील मृतदेह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा