Breaking

शनिवार, ३ जुलै, २०२१

उद्योगपती संजय घोडावत यांच्या विनंतीला मान देऊन आई वृध्दाश्रमाचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित..

 



प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


     जयसिंगपूरचे लोकप्रिय उद्योगपती संजय घोडावत यांना पाच कोटींच्या खंडणीसाठी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्या देणा-या आरोपींना व मुख्य सुत्रधाराला अटक करावी. व त्यांच्या कुटूंबियांना पोलिस संरक्षण द्यावे अन्यथा दि. ४/७/२०२१ रोजी अन्नत्याग करण्याचा इशारा आई वृध्दाश्रमाने दिला होता. 

       पण आई वृध्दाश्रमातील अनाथ व निराधार वृध्दांच्या वयोमानाचा विचार करून त्यांच्या भावनेची कदर करून  , आपल्यासाठी वृध्दाश्रमातील वृध्दांनी अन्नत्यागासारखे आंदोलन करू नये यासाठी संजय घोडावत यांनी स्वत: पुढाकार घेत आई वृध्दाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले यांच्या बरोबर फोन वरून चर्चा केली व आई वृध्दाश्रमाच्या पाठींब्याबद्दल आभार मानले. तसेच पोलिसांच्या तपासाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच कोल्हापुर जिल्हा पोलिस प्रमुख , जयसिंगपूर विभागाचे पोलिस उपाधिक्षक आणि हातकणंगले पोलिस ठाण्याचे पि. आय. यांनी चांगले सहकार्य केले आहे. खंडणी प्रकरणातील अनेक आरोपींना अटक केली आहे. तसेच मुख्य सुत्रधाराच्या सुध्दा लवकरात लवकर पोलिस मुसक्या आवळतील असा विश्र्वास व्यक्त करून उद्याचे आई वृध्दाश्रमाचे अन्नत्याग आंदोलन करू नये अशी विनंती केली.

      या विनंतीला मान देऊन आई वृध्दाश्रमाने सुध्दा पोलिस खंडणी प्रकरणातील मुळाशी जाऊन या कटात सहभागी असणा-या आरोपींना लवकरात लवकर अटक करतील . अशी आशा व्यक्त करून यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी मागणी करून उद्याचे आई वृध्दाश्रमाचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करत असलेचे जाहीर केले आहे.


आई वृध्दाश्रमाच्या उद्याच्या अन्नत्याग आंदोलनाकडे आणि उद्योगपती संजय घोडावत यांच्या भुमिकेकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिले होते. पण घोडावत यांनी या आंदोलनाची दखल घेऊन वृध्दांच्या वयोमानाचा व त्यांच्या भावनेचा विचार करून स्वत: हे आंदोलन थांबविण्यासाठी पुढाकार घेतला या गोष्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   यावेळी आई वृध्दाश्रमातील वृध्द आजींच्या बरोबर सुध्दा संजय घोडावत यांनी संवाद साधला यावेळी आजींनी त्यांना पाठिंबा देत आशिर्वाद दिला.

    आई वृध्दाश्रमाकडुन उपकाराची जाणीव ठेऊन कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पध्दत मात्र समाजाला अंतर्मुख करणारी आहे हे मात्र सत्य आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा