अश्विनी शिंदे : जयसिंगपूर प्रतिनिधी
देशात किंबहुना महाराष्ट्रात कोरोना महामारीचे प्रचंड मोठं संकट ओढवले असून या काळात व्यापारी, दुकानदार, मजूर, सामान्य नागरिकांबरोबर सर्वच घटकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सामान्य लोकांना कामधंदा नसल्यामुळे जीवन जगणे अत्यंत मुश्किल झाले आहे. याची सर्व कल्पना असतानाही या महाभयानक संकटाच्यावेळी MSEB कडून प्राप्त परिस्थितीचा विचार न करता पूर्णपणे व्यावसायिक होऊन लाईट बिलाचा भरणा वेळेत न केलेल्या वीज ग्राहकांची लाईट कनेक्शन कट करण्याची मनमानी कारवाई चालू ठेवली असून हे खेदजनक ,त्रासदायक व अत्यंत चुकीचे आहे.
तसेच त्यांच्याकडून लाईट बिलावर व्याज आकारणी चालू असून ती बंद करावी तसेच लाईट कनेक्शन न करता लोकांना विश्वासात घेऊन लाईट बिल भरण्यासाठी मुदत देऊन सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती व निवेदन मनसेकडून देण्यात आले आहे. या उपरी MSEB ने याची दखल न घेतल्यास मनसे स्टाईलने उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मनसे शिरोळ तालुका अध्यक्ष कुमार पुदाले,मनसे महिला सेल जिल्हाध्यक्ष सिंधुताई शिंदे, तालुका उपाध्यक्ष अभिनंदन पाटील,सचिव श्रीकांत सुतार, जयसिंगपूर शहराध्यक्ष निलेश भिसे, शहर उपाध्यक्ष सचिन चकोते व अमित पाटील, तालुक्यातील अनेक पदाधिकारी ,महिला पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या या समाजभिमुक आंदोलनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा