Breaking

बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

"जांभळी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त 101 वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने अभिवादन"

 


सौंदर्या पोवार : जयसिंगपूर प्रतिनिधी


      शिरोळ तालुका मातंग समाज संघटना व समस्त मातंग समाज जांभळी व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून पहिले शिवशाहीर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जांभळी येथे 101 वृक्षारोपण विद्या मंदिर जांभळी शाळा नंबर 1 येथे वृक्षारोपण करून आम्ही जांभळीकर ग्रुप ऑक्सीजन पार्क येथे महाश्रमदान करण्यात आले.

    सुरुवातीस अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन भजन सरपंच मा.खंडू खिलारे व मा.श्रीधर फारणे उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सर्व थोर महापुरुषांचे फोटो पूजन मा. फिरोज मुजावर ; अध्यक्ष शिरोळ तालुका सरपंच असोसिएशन, जयपाल कांबळे ग्रामपंचायत सदस्य, आरपीआय तालुकाध्यक्ष मा.राजू सूर्यवंशी,अनिल कोळी, विनायक कोळी,ज्ञानेश्वर जाधव,रामा कांबळे, संतोष उगळे,श्रीमंत कांबळे,सुकुमार कांबळे,सुरेश कांबळे,राकेश कांबळे, अजित हळदे,अजय पाटील, कृष्णा कांबळे व भाऊसाहेब आवळे उपस्थित होते.  


     कबीर कांबळे यांनी प्रास्तविकाच्या माध्यमातून मातंग समाज बांधवांच्या उत्थानासाठी संघटना कार्य करीत असून यामध्ये सामाजिक कार्य व रचनात्मक कार्याचा ही विचार केला जातो. जयंतीच्या कार्यक्रमाचे स्वागत समस्त मातंग समाजातील कार्यशील अध्यक्ष मा.शशिकांत घाटगे यांनी केले.महापूर व कोरोनाने शिरोळ तालुक्याला वेढले असल्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने जयंती साजरी करून 101 वृक्षारोपण करून एक आगळा-वेगळा वृक्ष संवर्धनाचा  संदेश देण्यात आला. जर वर्षी अण्णाभाऊ साठे व संयुक्त जयंती थोर महापुरुषांची मातंग समाजाकडून केली जाते ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मातंग समाजाला सांस्कृतिक भवन व्हावे अशी इच्छा व्यक्त करण्यात आली.     

      सरपंच मा. खिलारे यांनी भाषणामध्ये समाजासाठी नक्कीच सांस्कृतिक भवनसाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले या गोष्टीसाठी सर्वच ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते त्यांनी पाठिंबा दिला. मागासवर्गीय प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य जयपाल कांबळे यांनी मातंग समाजाच्या कायम आम्ही पाठीशी राहून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबतच अभिवचन व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा वैचारिक इतिहास सर्वांना सांगितला. समस्त मातंग समाजातील बांधव कृष्णा घाटगे, मार्तंड हुजरे, अभिषेक घाटगे, लोखंडे,अनिल घाटगे, जंबू घाटगे, शिवाजी घाटगे,शंकर घाटगे, संदीप घाटगे ,समस्त मातंग समाज व बहुजन समाजातील मान्यवर हजर होते. या कार्यक्रमाचे आभार हरोली गावचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आवळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा