Breaking

बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

धरणगुत्ती गावात ग्रामपंचायत प्रशासनाकडून पूर ओसरलेल्या परिसरात ग्रामपंचायतीकडून उत्तम पद्धतीने स्वच्छता




 गणेश कुरले : धरणगुत्ती प्रतिनिधी


    धरणगुत्ती गावातील पुराची परिस्थिती पाहता पुराच्या पाण्याची पातळी कमी होताना दिसत आहे ही बाब  ग्रामपंचायत सरपंच व  सदस्य तसेच मा.श्री.शेखर दादा पाटील(विद्यमान सदस्य )यांच्या लक्षात  येताच त्यांचे कडून त्वरीत गावातील स्वच्छतेबाबत निर्णय घेण्यात येऊन ग्रामपंचायत आरोग्य विभागाला त्वरित गावातील ज्या ठिकाणचे पाणी ओसरत आहे त्या ठिकाणीची सोबतच स्वच्छता करण्यात यावी असे सांगण्यात आले. त्यानुसार ग्रा.प.कर्मचारी वर्गाकडून त्या सूचनांचे पालन करून गट न.190 ते ग्रामपंचायत चौक ,धनगर गल्ली येथील भाग स्वच्छ करण्यात येत असून ज्या ठिकाणचे पाणी ओसरत आहे तेथील स्वच्छता करण्यात आली.

        धरणगुत्ती गावातील नागरिकाकडून ग्रामपंचायत प्रशासन व  सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा