हिना मुल्ला : विशेष प्रतिनिधी
कै.गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशन तेरवाड व मातंग समाज संघटना गंगापूर तेरवाड यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती व कोरोना व महापुरात उत्कृष्ट कामगिरी केले बद्दल, महावितरण अधिकारी व कर्मचारी, कुरूंदवाड नगरपालिका अधिकारी व कर्मचारी ,ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी तसेच आशा सेविका व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला, या प्रसंगी कुरूंदवाड चे माजी नगराध्यक्ष मा. रामचंद्र डांगे अध्यक्ष म्हणून लाभले, प्रमुख पाहुणे म्हणून, ए पी आय विकास अडसूळ साहेब, ए पी आय राजेंद्र उगलमुगले साहेब ,तसेच मार्गदर्शक राजीव किसनराव आवळे माजी आमदार व वक्ते म्हणून मा. प्रथमेश इंदुलकर उपस्थित होते, या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष मा. विलास कांबळे सर, उदय मिसाळ सर, विकास अडसूळ साहेब, राजीव आवळे साहेब तसेच रामचंद्र डांगे तात्या यांनी मनोगत व्यक्त केले, आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा जिवनपट प्रथमेश इंदुलकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर बंडगर साहेब, म्हादगोंडा पाटील साहेब, सौ. हर्षवर्धना भुयेकर, श्रीमती शोभा गोविंद आवळे, सौ काजल कांबळे माजी सरपंच, सौ .लक्ष्मी घटनटे, तंटामुक्त अध्यक्ष भास्कर कांबळे साहेब सामाजिक कार्यकर्ते आमगौडा पाटील साहेब ,प्राचार्य संदिप रायण्णावर व शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे पदाधिकारी उदय मिसाळ सर, महावीर आवळे, शशिकांत घाटगे, संदिप बिरणगे उपस्थित होते. या प्रसंगी सुभाष गायकवाड, धोंडीराम गायकवाड , राजाराम गायकवाड व राजेंद्र कांबळे या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.ह्या कार्यक्रमाचे नियोजन उमेश आवळे, उमेश शेडबाले, शशिकांत सनदी, मुरग्याप्पा हेगडे, तुकाराम आवळे, आदित्य मोरे, सुरेश शेडबाले, कैलास मोरे, सुखदेव हेगडे, श्रीकांत हेगडे, रवि शेडबाले ,ऋषिकेश व्हसमाने,रवी हेगडे,दत्ता शेडबाले, योगेश ऐवाले संजय शेडबाले, राकेश सातपुते, रमेश शेडबाले, सिद्धार्थ नाटेकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केले व नियोजित वेळेत कार्यक्रम पार पाडला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार उमेश आवळे यांनी मानले.
या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा