Breaking

शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

*काबूल विमानतळावरुन १५० भारतीयांचं अपहरण*

 


हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी


     अफगाणिस्तान येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. काबूल विमानतळाजवळून शनिवारी सकाळी १५० नागिरकांचे तालिबान्यांनी अपहरण केले आहे. यात बहुतांश भारतीय नागरिकांचा समावेश आहे. अफगाणिस्तान मधील स्थानिक मीडियाने या घटनेची पुष्टी केली आहे.

तालिबान्यांनी अपहरण केलेल्यांमध्ये भारतीयांसह अफगाणिस्तानात राहणाऱ्या शिख नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांचे काबूल मधील हामिद करजई विमानतळाजवळून अपहरण करण्यात आले आहे. दरम्यान, तालिबानने अफगाण मीडियाकडे बोलताना भारतीयांचे अपहरण केलेल्या वृत्ताचे खंडन केले आहे.

अफगाणिस्तानमध्ये अनेक भारतीय अडकून पडले आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अनेकांनी अफगाणिस्तान सोडून जाण्यास सुरुवात केली आहे. भारतीयांना सुरक्षित मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. याच दरम्यान तालिबान्यांनी भारतीयांचं अपहरण केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा