प्रियकरानं दुसऱ्याच मुलीशी संसार थाटल्यानं पुण्यातील एका युवतीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. प्रियकरानं प्रेमात धोका देऊन अन्य मुलीशी लग्न केल्यानं नैराश्यात गेलेल्या 22 वर्षीय तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या आई वडिलां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.मनिषा गोविंद गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीचं नाव असून ती फुरसुंगी परिसरातील रहिवासी आहेत.
मागील काही दिवसांपासून तिचं हडपसर परिसरातील पानमळा येथे राहणाऱ्या नितीन दत्तात्रय गायकवाड (वय-23) याच्याशी प्रेमसंबंध सुरू होते. यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती नितीनच्या आई वडिलांनाही माहीत होती. असं असूनही त्यांनी आपल्या मुलाचा विवाह अन्य एका मुलीशी लावून दिला.
आपल्या प्रियकरानं परस्पर दुसऱ्या मुलीशी संसार थाटल्याचं कळताच मनिषा नैराश्याच्या गर्तेत गेली. यातूनच तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी मृत मनिषाचे वडील गोविंद यांनी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा