इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी प्रस्तावित सीईटी (अकरावी सीईटी )उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली आहे. अकरावी सीईटी न घेता इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
सीईटीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. प्रवेश ११ वी प्रक्रिया कधी सुरु होणार?,याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.
हा निर्णय म्हणजे एक प्रकारे राज्य सरकारला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.उच्च न्यायालयाने ११ वी प्रवेश प्रकिया सहा आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत.
करोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळेच न्यायालयाला याप्रकरणी हस्तक्षेप करावा लागला, असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमधील ताण कमी झाला असला तरी या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल अशा संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा