Breaking

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

*लोकसभेत 'ओबीसी लिस्ट' घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरु*



हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी 


     दिल्ली : राज्यांना इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी लिस्ट बनविण्याचा अधिकार देणारे घटनादुरुस्ती विधेयक सोमवारी (दि.९) लोकसभेत सादर करण्‍यात आले होते. आज लोकसभेत या विधेयकावर चर्चा सुरु झाली. देशात ‘ओबीसी’ (इतर मागासवर्गीय प्रवर्ग) साठी ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आरक्षण हवे, अशी मागणी काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांनी केली.राज्यांना इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी लिस्ट बनविण्याचा अधिकार देणार्‍या १२७ व्‍या घटनादुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत सादर करण्‍यात आले होते.ओबीसी लिस्ट बनविण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आल्यानंतर मराठा आरक्षणासह देशभरातील आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे काँग्रेससह तमाम विरोधी पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.

---------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा