Breaking

शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

पर्यावरण अभ्यास विषयाची परीक्षा उद्या दुपारी 12. 30 ते 1.30 या कालावधीमध्ये; ५१ हजार विद्यार्थी परीक्षा देणार : मा.गजानन पळसे,प्र. परीक्षा नियंत्रक

 


प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


 कोल्हापूर  : उद्या रविवार दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी शिवाजी विद्यापीठामार्फत पदवी स्तरावरील, सत्र चार मधील आवश्यक असणारा पर्यावरण अभ्यास या विषयाची परीक्षा दुपारी 12. 30 ते 1.30 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. 

     या विषयासाठी एकूण 51 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देणार आहेत या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत एसएमएस व ईमेल द्वारे पुनश्च एकदा युजर आयडी व पासवर्ड पाठविण्यात आलेले आहेत तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सर्व आवश्यक अनुषंगीक माहिती देण्यात आलेली आहे. सदर विद्यार्थ्यांना जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांनी हेल्पलाइन नंबर वर कॉल करून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावयाचे आहे.

👇👇👇👇👇👇

1) 9513824123

2) 9513824234

     याप्रमाणे आवाहन परीक्षा विभागामार्फत करण्यात येत आहे.

   तसेच अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांनी ती त्वरित द्यावी म्हणजे मुख्य परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना कोणत्याही स्वरूपाची तांत्रिक अडचण जाणवणार नाही असे आवाहन करण्यात येत आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा