गीता माने : सहसंपादक
जयसिंगपूर शहरातील विद्यार्थी व ज्ञानकेंद्रित असणाऱ्या 'द जिनियस क्लासेस' धीरज उल्हास मादनाईक या विद्यार्थ्यांने 12वी विज्ञान विभागामध्ये 98.16% गुण मिळवून जयसिंगपूर केंद्रामध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला.
द जिनिअस क्लासच्या विद्यार्थ्यांनी आपला जिनिअसपणा दाखवित आदित्य क्वाणे 97.66%,सेजल कुरडे, 97% प्रगती तोडकर 93.33%, मंदिरा थोरात 92.33% ,साक्षी लंगरे 92.16% ,समृध्दी पाटील 91.66%, सृष्टी कोडोले 90.66% गुण संपादन करून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचे दर्शन घडविले.
क्लासच्या गुणवत्तेचे वैशिष्ट्य म्हणजे ९०% टक्केच्या वर गुण प्राप्त करणारे जवळपास ८ विद्यार्थी आहेत. या सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना द जिनिअस क्लासेसचे संचालक प्रा. विनायक रजपूत व तज्ञ प्राध्यापकांचे उत्तम पद्धतीचे मार्गदर्शन लाभले यामुळे आम्ही हे यश संपादित करू शकलो अशा प्रकारची प्रतिक्रिया सदर कार्यक्रमात या गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी दिली. या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच क्लासचे विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवून गुणवत्तेला प्राधान्य देणे हे जिनिअस क्लासचे वैशिष्ट्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा