Breaking

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

जयसिंगपूर कॉलेजमध्ये एच.एस.सी.बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 


हिना मुल्ला : जयसिंगपूर प्रतिनिधी


    जयसिंगपूर कॉलेजमध्ये एच.एस.सी. बोर्ड परीक्षा २०२१ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे व प्र.प्राचार्य प्रा.डॉ.सुरत मांजरे उपस्थित होते.

         सुरुवातीस सौ.एम.एस.पाटील उपप्राचार्या,ज्युनिअर विभाग यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.महावीर अक्कोळे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना बहुमोल संदेश देताना ते म्हणाले की, आज तागायत गुरुजनांनी आणि आई-वडिलांनी आजपर्यंत जी संस्काराची शिदोरी,योग्य मार्गदर्शन केलेले आहे त्याप्रमाणे आपल्या करीयरची वाटचाल करावी. मिळालेल्या यशाने हुरळून न जाता पुढील आव्हाने स्वीकारण्यास तयार रहावे. हे समजावून सांगताना त्यांनी महात्मा गांधीजीनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाची आठवण करून दिली. 

      या कार्यक्रम प्रसंगी कॉलेजचे नूतन प्र.प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी विद्यार्थांना महाविद्यालयातील सुसज्ज ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा केंद्र आणि विद्यार्थी कौशल्य केंद्राच्या माध्यमातून करियर व व्यक्तिमत्त्व परिपूर्ण करून भविष्य उज्ज्वल करावे असे आव्हान केले.त्याचबरोबर पालकांनी आपल्या पाल्याचा कल, आवड आणि क्षमता पाहूनच पुढील शिक्षण द्यावे असा सल्लाही दिला. जयसिंगपूर कॉलेज पूर्वीपासून तालुक्यातील आणि इतर विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी नेहमीच कटिबद्ध असून पुढेही यापेक्षाही अधिक क्षमतेने आम्ही प्रयत्नशील राहू असा विश्वास व्यक्त केला.

   गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेतून कु.सृष्टी सुनील आवटी (94%),कु.श्रध्दा नाईकबा यादव (91.50%), कु. अश्विनी अनिल भेंडवडे (86%),

     वाणिज्य विभागातून श्री.किशोर बाळू वाघमोडे (94.50%), श्री.साहिल राहतहुसेन इनामदार (90.50%), कु.मिनाज दाऊद पटेल (84.17%) तर विज्ञान शाखेतून श्री.आदित्य संजयकुमार क्वाणे (97.67%), कु. मंदिरा मानसिंग थोरात (92.23%),कु.साक्षी राजेंद्र लंगरे (92.16%) या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

   प्रा.भारत आलदर( सुपरवायझर) यांनी यथोचित आभार मानले. प्रा.सुनील चौगुले यांनी उत्तम पद्धतीने सूत्रसंचालन केले. हा सर्व कार्यक्रम स्थानिक समितीचे अध्यक्ष, डॉ. सुभाष अडदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.या कार्यक्रमास श्री. बाळासाहेब शशांक इंगळे सदस्य, स्थानिक समिती, ज्युनिअर विभागातील सर्व शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

1 टिप्पणी: