Breaking

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

*"धरणगुत्ती येथील पूरग्रस्त नागरिकांना रोटरी क्लब ऑफ कृष्णा वॅली सांगली,रोटरी क्लब ऑफ गार्गीज कोल्हापूर व सावली ग्रुपनी केला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा"*

 


गणेश कुरले : धरणगुत्ती प्रतिनिधी


    सन २०२१ च्या महापुराने शिरोळ तालुक्यातील शेती, घर व अन्य भौतिक साहित्याचे आर्थिक नुकसान प्रचंड प्रमाणात झाले आहे.अशावेळी धरणगुत्ती येथील पूरग्रस्त नागरिकांना रोटरी क्लब ऑफ कृष्णा वॅली सांगली,रोटरी क्लब ऑफ गार्गीज कोल्हापूर व सावली ग्रुपनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून धरणगुती गावातील पूरग्रस्त नागरिकांना दिलासा दिला आहे. 

   यावेळी रोटरी क्लब ऑफ कृष्णा वॅली सांगली, रोटे. श्री जयजीत परितकर- अध्यक्ष, रोटे. श्री वीरेंद्र पाटील- सेक्रेटरी, रोटे. श्री राजन राजोपाध्ये, रोटे. श्री संजीव पाटील. रोटे. श्री संदीप नाईक.

    सावली ग्रुप- श्री अमित मगदूम, श्री वसंत काकडे, श्री रणजीत परीतकर, श्री दुशांत बोण्डगे, श्री बबलू शिंदे, श्री अमित बडवे. 

     रोटरी क्लब ऑफ गार्गीज कोल्हापूर- सौ. दीपिका कुंभोजकार-   अध्यक्षा, सौ. अनघा पेंढारकर, गौरी शिरोडकर यांनी प्रत्यक्षात येऊन या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला.

     यावेळी धरणगुत्ती गावातील सामाजिक कार्यकर्ते व कार्यशील नेते शेखर पाटील यांचे बरोबर गावातील मा.सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,प्रतिष्ठित घटक व पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते. गावातील या पूरग्रस्त नागरिकांनी या सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या या रोटरी क्लब व ग्रुपच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करून मनोभावे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा