#सरला ठकराल या फक्त 21 वर्षाच्या होत्या जेव्हा 1936 मध्ये वैमानिक परवाना मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक ठरल्या.
# 1936 साली त्यांनी जेव्हा पहिल्यांदा पारंपारीक साडी नेसून विमान उडवले त्यावेळी त्या चार वर्षाच्या मुलीच्या आई होत्या.
![]() |
गुगलने बनवलेलं खास डुडल |
(संकलन - योगेश घाडेकर, विशेष प्रतिनिधी)
भारतातील पहिल्या महिला वैमानिक सरला ठकराल यांच्या 107 व्या स्मृतिदनानिमित्त गुगलने खास डुडल (doodle) द्वारे मानवंदना दिली आहे. सरला ठकराल यांचं गूगल कडून दुसर्यांदा हे डूडल झळकले आहे. मागील वर्षी केरळ मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेच्या वेळेस देखील हे डूडल ठेवण्यात आले होते. गूगलने जारी केलेल्या स्टेटमेंट मध्ये आम्ही एकच डूडल दोनदा साकारत नाही पण सरला ठकराल अपवाद आहेत. त्यांच्यामुळे एव्हिएशन क्षेत्रातील महिलांना प्रेरणा मिळते त्यामुळे आज त्यांच्या 107 व्या बर्थ डे निमित्त पुन्हा त्यांना आदरांजली म्हणून हे डूडल साकारण्यात आले आहे.
![]() |
सरला ठकराल |
सरला ठकराल (8 ऑगस्ट 1914 ते 15 मार्च 2008) यांचा जन्म नवी दिल्ली येथे झाला. सरला या सोळा वर्षाच्या असताना पी. डी. शर्मा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर पी. डी शर्मांनी सरला यांना विमान चालक बनवण्यासाठी प्रोत्साहित केले, पतीकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे सरला ठकराल यांनी वैमानिक प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. सरला यांच्या कुटुंबाकडे आधीच नऊ पायलट होते ते सर्व त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा देत होते.
सुरुवातीला त्यांनी पारंपारीक साडी नेसून जिप्सी मोथ जातीचे विमान स्वतः एकट्याने उडवले. विशेष म्हणजे यावेळी त्या एका चार वर्षाच्या मुलीच्या आई होत्या. पायलट चे लायसन्स मिळविल्यानंतर त्यांनी फ्लाइंग क्लब लाहोर येथून एक विमान खरेदी केले व त्यामधून 1000 तासांची उड्डाण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांना लायसन मध्ये 'A' मानांकन मिळाले.
जेव्हा त्यांनी कमर्शियल पायलट बनण्याच्या निर्णय घेतला त्याचवेळी द्वितीय महायुद्ध सुरु झाल्यामुळे त्यांना ते पूर्ण करता येवू शकले नाही. त्यानंतर दुर्दैवाने त्यांचे पती शर्मा हे १९३९ मध्ये एका विमान अपघातात मृत्यू पावले. पुढे १९४८ साली आर. पी. ठकराल यांच्याशी पुनर्विवाह केल्यानंतर आपला दुसरा पती आणि दोन मुलींसह दिल्ली येथे स्थायिक झाल्या. काहीतरी करण्याची जिद्द त्यांना शांत बसू देत नव्हती. पुढे त्या एका एक यशस्वी उद्योजिका आणि चित्रकार बनल्या. सरला ठकराल यांचा 2008 मध्ये मृत्यू झाला.
अशा या पहिल्या भारतीय महिला वैमानिक सरला ठकराल यांना यांच्या जन्मदिवसा निमित्त / जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
जय हिंद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा