*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*
कोल्हापूर : परिते-कुरुकली (ता. करवीर) येथील गर्भलिंग निदान सेंटरप्रकरणी करवीर पोलिसांनी फराकटेवाडी- बोरवडे (ता. कागल) येथील डॉक्टर पत्नीसह तिघांना गुरुवारी अटक केली. भारती कृष्णात फराकटे (वय 45), एजंट लक्ष्मण भिकाजी वाकरेकर (43, सुळे, ता. पन्हाळा), दिगंबर मारुती किल्लेदार (42, टिटवे, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत.
गर्भलिंग निदानप्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता 13 वर पोहोचली आहे.संशयित वाकरेकर व किल्लेदार यांना न्यायालयाने 7 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. गर्भलिंग निदान सेंटरप्रकरणी सीमाभागातील आणखी सहा-सात एजंटांची नावे पुढे येत आहेत. एजंटांसह गर्भलिंग निदान करण्यास प्रवृत्त करणार्यांचाही लवकरच पर्दाफाश करण्यात येईल, असे तपासाधिकारी तथा सहायक निरीक्षक विवेकानंद राळेभात यांनी सांगितले. भारती फराकटे यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणाला अजून कोणती दिशा मिळणार? यामध्ये आणखी किती लोक गुंतले आहेत याविषयी लोकांच्यामध्ये चर्चा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा